मुंबई : सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘मेटा’ने (Meta) आपल्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) साठी नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लॅन जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे जगभरातील अब्जावधी युजर्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, भविष्यात प्रीमियम फीचर्स वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात.
आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. वैयक्तिक संवादापासून व्यवसाय, मार्केटिंग आणि मनोरंजनापर्यंत या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अशातच मेटाने आपल्या कमाईचे नवीन मार्ग शोधत ‘प्लस व्हर्जन’ किंवा प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प आता नव्या टप्प्यात दाखल झाला आहे. ...
याआधी एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मने पेड सेवा सुरू केली होती. त्यानंतर आता मेटानेही त्याच धर्तीवर फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसाठी सशुल्क सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय युजर्ससह जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेटाच्या या नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लॅनअंतर्गत युजर्सना काही विशेष आणि प्रगत सुविधा दिल्या जाणार आहेत. या प्लॅनमध्ये अतिरिक्त कस्टमायझेशन फीचर्स, प्रीमियम टूल्स, अधिक नियंत्रण असलेले सेटिंग्ज पर्याय आणि काही एक्सक्लुझिव्ह सुविधा मिळू शकतात.
Sumit Antil : भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. दुहेरी पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ...
कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या प्रगत फीचर्सचा फायदा विशेषतः कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स, व्यवसायिक युजर्स आणि प्रोफेशनल वापरकर्त्यांना होणार असल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत मोफत उपलब्ध असलेली काही फीचर्स भविष्यात केवळ पेड युजर्ससाठी मर्यादित केली जाऊ शकतात, अशीही चर्चा रंगू लागली आहे.
महिन्याला किती पैसे मोजावे लागतील?
मेटाने जागतिक स्तरावर आपल्या प्रीमियम प्लॅन्सच्या संभाव्य किंमती जाहीर केल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, इंस्टाग्राम प्लस आणि फेसबुक प्लससाठी सुमारे ३८७ रुपये प्रतिमहिना शुल्क आकारले जाऊ शकते. तर व्हॉट्सॲप प्लससाठी अंदाजे २९० रुपये प्रतिमहिना मोजावे लागू शकतात. मात्र, भारतातील युजर्ससाठी अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठेनुसार या प्लॅन्सच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याघटनेमुळे ...
मेटाने स्पष्ट केले आहे की, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मोफत सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. सामान्य युजर्सना बेसिक फीचर्स वापरण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, अधिक प्रगत फीचर्स आणि एक्सक्लुझिव्ह टूल्स वापरायचे असतील, तर युजर्सना प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते.
मेटाच्या या निर्णयामुळे सोशल मीडिया क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, भविष्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अधिकाधिक सशुल्क सेवांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



