डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत थांबवली

वॉशिंगटन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्षाची सूत्रे हाती घेताच ट्रम्प अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी अनेक आदेशांवर सह्या केल्या. यामध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेतील बेकायदेशीर निर्वासितांवर कारवाई केली. त्यानंतर आता ट्रम्प यांनी भारता शेजारील असलेला देश बांगलादेशावर मोठी कारवाई केली आहे.

ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे तीन महिने थांबवण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढल्या आहेत.माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-बांगलादेश करार, कार्य आदेश, अनुदान, सहकारी करार किंवा इतर सहाय्य किंवा संपादन साधनांतर्गत कोणतेही काम तात्काळ थांबवण्याचे किंवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी काही दिवसापूर्वी बांगलादेशबाबत विधान केले होते. म्हणाले होते की, सरकारला ८५ दिवसांच्या आत सर्व परदेशी मदतीचा अंतर्गत आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

बांगलादेशचे मोहम्मद युनूस हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे जवळचे मानले जातात. ट्रम्प प्रशासनाने पुढील महिन्यात होणाऱ्या नॅशनल ब्रेकफास्ट प्रेयर्स बीएनपी नेत्यांनाही आमंत्रित केले आहे.या बैठकीनंतर, अमेरिका बांगलादेशात लवकरच निवडणुका घेण्यासाठी दबाव टाकू शकतो असं मानले जात आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्या आहेत, आता बांगलादेशात सत्तांतर झाले असून युनुस शेख यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.अमेरिकेत सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी अनेक देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर ९० दिवसांसाठी बंदी घातली आहे. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात बायडेन प्रशासनाने युक्रेनला बरीच मदत करणे सुरू ठेवले, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच ती मदत थांबवली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील