Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीमंत्र्याच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्र्याच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक घटना घडली. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या जवळ पोहोचताच तरुणाने अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरुणाला रोखले. पण यामुळे थोडा वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी येतात. पण अजित पवार हे पुणे आणि बीड अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. यामुळे प्रजासत्ताक दिनी ते पुण्यात होते आणि बीड जिल्ह्यात मंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रध्वजाला सलामी देतील, असे जाहीर करण्यात आले. शासकीय नियोजनानुसार भरणे यांनी शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यानंतर त्यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाला. ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या जवळ पोहोचताच तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

वडिलांचा मृत्यू सहन न झाल्याने मुलीनेही संपवले जीवन

बीड नगरपालिकेतील घोटाळ्याची चौकशी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा, ही मागणी करण्यासाठी तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समजले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

डंपर-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू तर तीनजण जखमी

मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा सतत चर्चेत आहे. आधी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार आहे. इतर आरोपी कोठडीत आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. आता तरुणाच्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा बीडमधील कारभाराची चर्चा सुरू झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -