मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. यंदा सात मान्यवरांना पद्मविभूषण आणि १९ जणांना पद्मभूषण तर ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर पद्मश्री सेच गझल गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉलिवूडचे र्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकि‍र्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री जाहीर झाला आहे. यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचा समावेश आहे. या वर्षी एकूण १३९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यात २३ महिला तर १० परदेशी नागरिक आहेत. यातील १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.





व्यापार आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.



अच्युत पालव – कलाक्षेत्र
अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
अशोक सराफ – कलाक्षेत्र
अश्विनी भिडे-देशपांडे – कलाक्षेत्र
चैत्राम पवार – सामाजिक सेवा
जसपिंदर नरुला – कलाक्षेत्र
मारुती चितमपल्ली – साहित्यिक आणि अभ्यासक
रणेंद्र मुजुमदार – कलाक्षेत्र
सुभाष शर्मा – शेती
वासुदेव कामत – कलाक्षेत्र
विलास डांगरे – औषध
Comments
Add Comment

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले