नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. यंदा सात मान्यवरांना पद्मविभूषण आणि १९ जणांना पद्मभूषण तर ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर पद्मश्री सेच गझल गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉलिवूडचे र्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री जाहीर झाला आहे. यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचा समावेश आहे. या वर्षी एकूण १३९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यात २३ महिला तर १० परदेशी नागरिक आहेत. यातील १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.
अच्युत पालव – कलाक्षेत्र
अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
अशोक सराफ – कलाक्षेत्र
अश्विनी भिडे-देशपांडे – कलाक्षेत्र
चैत्राम पवार – सामाजिक सेवा
जसपिंदर नरुला – कलाक्षेत्र
मारुती चितमपल्ली – साहित्यिक आणि अभ्यासक
रणेंद्र मुजुमदार – कलाक्षेत्र
सुभाष शर्मा – शेती
वासुदेव कामत – कलाक्षेत्र
विलास डांगरे – औषध
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…