Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीभारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाविषयी या बाबी माहिती आहेत का ?

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाविषयी या बाबी माहिती आहेत का ?

  1. भारत रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले. भारताने संविधान स्वीकारले. या संविधानाने ब्रिटिशांच्या ‘गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1935’ची जागा घेतली. संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाल्यामुळे या दिवसापासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतात २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्यासाठी संघर्ष सुरू झाला आणि संविधान स्वीकारल्यामुळे भारतात लोकांची अर्थात प्रजेची सत्ता आली. देश प्रजासत्ताक झाला. देशाला १९२९ मध्ये ब्रिटिशांच्या नेतृत्वात नियंत्रित स्वातंत्र्य मिळाले. लाहोरमध्ये काँग्रेसने १९ डिसेंबर १९२९ रोजी पूर्ण स्वराज्य मागितले. यासाठीचा संघर्ष २६ जानेवारी १९३० पासून सुरू झाला. ब्रिटिश इंडिया २६ जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा करायची आणि १९४७ पासून १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. देशात २६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
  2. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा होत असला तरी त्याची त्याची आदल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरू होते. प्रत्यक्ष संचलनाच्या दिवशी जे संचलनात सहभागी होणार असतात ते पहाटे तीन वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी उपस्थित असतात. प्रत्यक्ष संचलनाआधी जवळपास ६०० तासांचा संचलनाचा सराव झालेला असतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम गुरुवार २३ जानेवारी २०२५ रोजी झाली.
  3. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला एक परदेशी पाहुणा आमंत्रित केला जातो. यंदा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रजासत्ताक दिनाचे शाही पाहुणे आहेत.
  4. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत सुरू असताना तोफांची सलामी दिली जाते. पहिली तोफ राष्ट्रगीत सुरू होताच सलामी देते. यानंतर ५२ सेकंदांनी तोफेद्वारे दुसरी सलामी दिली जाते.
  5. दरवर्षी प्रजासत्ताक दिनासाठी एक संकल्पना निश्चित केली जाते. या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्व केंद्र आणि राज्य पातळीवरील सरकारी यंत्रणा कार्यक्रमात सहभागी होताना संकल्पनेनुसार नियोजन करतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना ‘स्वर्णिम भारत – विरासत और विकास’ ही आहे.
  6. प्रजासत्ताक दिनासाठी कर्तव्य पथावरुन विजय चौक ते इंडिया गेट असे संचलन केले जाते. राष्ट्रपती भवन, लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने हे संचलन सुरू असते. लाल किल्ल्यावरुन मान्यवर संचलन बघतात.
  7. पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा २६ जानेवारी १९५० रोजी नवी दिल्ली येथील आयर्विन स्टेडियम आताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या संचलनात तीन हजार जवान सहभागी झाले. हवाई कसरतींमध्ये १०० विमान – हेलिकॉप्टर यांचा ताफा सहभागी झाला होता.
  8. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुलांच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची तसेच इतर अनेक सरकारी पुरस्कारांची आणि शौर्य पुरस्कारांची घोषणा केली जाते. यात नागरिकांचा गौरव करणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या घोषणेचाही समावेश असतो.

केंद्र सरकारकडून शौर्य, सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा; महाराष्ट्र पोलीस दलाला ४८ राष्ट्रपती पदके जाहीर

Republic Day Ceremony 2025 : प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथ सज्ज

प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत सहा पदरी संरक्षण व्यवस्था

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -