Saturday, June 14, 2025

Pune Accident : पुण्याहून मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी जाणाऱ्या ६ जणांवर काळाचा घाला

Pune Accident : पुण्याहून मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी जाणाऱ्या ६ जणांवर काळाचा घाला

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वडगाव पुलावर भीषण अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या बसला मागून स्विफ्ट कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.



आज सकाळी ५ च्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली. मित्राच्या वाढदिवसानिमित्त गाडी घेऊन हे ६ मित्र फिरायला गेले होते. रात्री वाढदिवस साजरा करून ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्याच्या दिशेने जाताना वडगाव पुलाजवळील एका उभ्या असलेल्या बसला स्विफ्ट कार धडकली. या कार मध्ये ६ मित्र होते.



दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ४ मित्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे प्रसंगावधान दाखवत आजूबाजूच्या नागरिकांनीही अपघातग्रस्त तरुणांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत केली. दरम्यान स्विफ्ट चालक नशेत होता की डुलकी लागल्याने हा अपघात घडला याचा पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment