
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वडगाव पुलावर भीषण अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या बसला मागून स्विफ्ट कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी जम्बो मेगाब्लॉक आहे. तसेच ...
आज सकाळी ५ च्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली. मित्राच्या वाढदिवसानिमित्त गाडी घेऊन हे ६ मित्र फिरायला गेले होते. रात्री वाढदिवस साजरा करून ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्याच्या दिशेने जाताना वडगाव पुलाजवळील एका उभ्या असलेल्या बसला स्विफ्ट कार धडकली. या कार मध्ये ६ मित्र होते.

मुंबई : मालाड पश्चिम येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करुन गळती बंद करण्यासाठी तातडीने काम केले ...
दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ४ मित्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे प्रसंगावधान दाखवत आजूबाजूच्या नागरिकांनीही अपघातग्रस्त तरुणांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत केली. दरम्यान स्विफ्ट चालक नशेत होता की डुलकी लागल्याने हा अपघात घडला याचा पोलीस तपास करत आहेत.