मुंबई : अंधेरीत झालेल्या मेळाव्यात अमित शाह यांच्यावर टीका करणा-या उद्धव ठाकरे यांच्या अब्रूची लक्तरे भाजपा नेत्यांनी काढली आहेत. यात मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तर उबाठाच्या मेंदूतच झोल आहे असे म्हणत त्यांची बोलती बंद करून टाकली आहे.
त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, उध्दव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० चा आहे. त्यामुळे १९५१ साली स्थापन झालेल्या जन संघा विषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही.
५ आणि ६ एप्रिल १९८० रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी उध्दव ठाकरे यांचे वय २० वर्षे होते. त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि करगोट्यातून इज्जत निसट्याच्या वयात असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या उध्दव ठाकरे यांना आमचे सांगणे आहे की, तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपाच्या स्थापनेवर बोलता ? १०० वर्षे पुर्ण करणाऱ्या संघावर बोलता?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा बहुमान उंचावला तसेच भाजपा जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करुन दाखवला त्या अमितभाई शाह यांच्यावर बोलता ..?
समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही !!
उद्धव ठाकरे तुम्ही अमितभाई शाह यांच्या पाठीवर वळ उठवणार आहात ? कसले? केव्हा ?
आधी तुम्ही तुमचे वडिल म्हणजे अखंड हिदूंचे आशास्थान वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा २६ जुलैच्या पुरात अडकले होते.. तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला “पाठ दाखवून” पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत, ते कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा !
कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्याबोळ केलात त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत. त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारुन पहा!
मग कळेल जखमा खोल आहेत की, तुमच्या मेंदूतच झोल आहे !! अशा खरमरीत शब्दात शेलार यांनी उबाठांना खडे बोल सुनावले आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…