सोमवारी महापालिका सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा होणार

मुंबई: मुंबईचे महापौरआणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या निवडीकडे आहे. या दोन्ही पदांची घोषणा येत्या सोमवारी महापालिका सभागृहात होणार आहे. सभागृहनेत्या आणि विरोधी पक्षनेत्यांच्या नावांच्या घोषणेसह स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यांचीही नावे जाहीर ली जाणार आहे.


मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर दुसरी विशेष सभा येत्या सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या विशेष सभेत विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते पदाची नावे जाहीर करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाचे गटनेते यांची पर्यायाने सभागृहनेते पदी निवड होते, तर विरोधी पक्षाच्या गटनेत्याची निवड ही विरोधी पक्षनेतेपदी होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे गटनेते गणेश खणकर यांची सभागृहनेते पदी तर विरोधी पक्षाचे म्हणजे उबाठाचे गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेतेपदी होणार आहे. दोन्ही पक्षाकडून महापौरांना प्राप्त झालेल्या पत्रानुसार महापौर या दोन्ही गटनेत्यांची अनुक्रमे सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते म्हणून नावे जाहीर करणार आहे.


मुंबई महापालिकेत स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्या असून या चारही समित्यांवरील नियुक्त सदस्यांची नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार महापौरांकडून त्यांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे सदस्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर येत्या २० फेब्रुवारी शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होईल. यासाठी १८ फेब्रुवारी रोजी दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर केले जातील. तर सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षांची निवड २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासाठी २० फेब्रुवारी रोजी या दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवारी अर्ज सादर केले जातील.



कशाप्रकारे असतील समितीत पक्ष संख्याबळ


 

स्थायी समिती (२६): (भाजप : १०,शिवसेना :०४,उबाठा :०७, काँग्रेस :०३,मनसे : ०१,एमआयएम :०१)


शिक्षण समिती(२२अधिक ४) : (भाजप : ११,शिवसेना :०४,उबाठा :०७, काँग्रेस :०२,मनसे : ०१,एमआयएम :०१)


सुधार समिती(२६) : (भाजप : १०, शिवसेना :०४,उबाठा :०७, काँग्रेस :०३,मनसे : ०१,एमआयएम :०१)

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)