Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Gujrat : आणंदमध्ये १०७ किलो ड्रग्ज जप्त

Gujrat : आणंदमध्ये १०७ किलो ड्रग्ज जप्त

छापेमारीत ५ जणांना करण्यात आली अटक


आणंद : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणंद जिल्ह्यातील खंभाट भागात मोठी कारवाई केली. यावेळी १०७ किलो अल्प्राझोलम पावडर जप्त करण्यात आले. तसेच ५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आनंद जिल्ह्यात अल्प्राझोलम नावाच्या पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी एटीएसने १०७ कोटी रुपये किंमतीच्या प्रतिबंधीत ड्रग्जसह ५ जणांना अटक केली आहे. अल्प्राझोलमचा नशेसाठी गैरवापर केला जात असल्याने ते नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या कक्षेत येते. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सकडून (सीबीएन) अल्प्राझोलम उत्पादनासाठी परवाना दिला जातो.



दरम्यान, एटीएसच्या छाप्यादरम्यान संशयित आरोपींकडे परवाना मागितला असता, त्यांच्याकडे तो नव्हता. यावेळी पाच जण युनिट चालवत होते, तर सहावा व्यक्ती रिसीव्हर होता. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की पाचही आरोपींनी सायकोट्रॉपिक पदार्थ तयार करण्यासाठी कारखाना भाड्याने घेतला होता. दरम्यान गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, एटीएसने ५ जणांना अटक केली आहे. या कारवाईत झोपेच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरली जाणारी १०७ किलोपेक्षा जास्त पावडर जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment