मुंबई : काही महिन्यांपूर्वी अनेक दूध कंपन्यांनी दूधाच्या किमतीत दरवाढ केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत होता. मात्र आता महागाईच्या काळात अमूलने ग्राहकांना दिलासा दिला आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने शुक्रवारी अमूल दुधाच्या किमती १ रुपयांनी कमी केल्याचे जाहीर केले (Amul Milk Price) आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Republic Day : प्रजासत्ताक दिन परेडसाठी नवी दिल्लीत पंतप्रधानांसह ‘या’ विशेष पाहुण्यांना आमंत्रण!
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ही दरकपात केवळ गुजरातमधील ग्राहकांनाच मिळणार आहे. नवीन किंमतीनुसार, आता अमूल गोल्डचा एक लिटर पॅक ६६ रुपयांना, तर अर्धा लिटरचा पॅक ३३ रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, अमूल फ्रेश मिल्कची किंमत आता ५४ रुपये प्रति लिटर आहे, तर अर्धा लिटर पॅक २७ रुपयांना उपलब्ध असेल. अमूल शक्तीचा एक लिटर पॅक आता ६० रुपयांना मिळणार आहे. (Amul Milk Price)