दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्विर्झर्लंडमधील दावोस येथे असलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा केला. लवकरच उद्धव ठाकरे गटाला जबर धक्का बसेल, असेही उदय सामंत म्हणाले. याआधी शिवसेनेचे लोकसभेतील खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे भाकीत केले होते. दोन शिवसेना नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे गटाचे काय होणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या सुमारास उदय सामंत यांचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांनी काँग्रेसचे निवडक आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पक्षात फूट पडणार नाही, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्योगमंत्र्यांना फक्त राजकारण करायचे असेल तर त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमधून परत महाराष्ट्रात पाठवून द्यावे,असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा
एकूण सदस्य २८८
भाजपा १३२
शिवसेना ५७
राष्ट्रवादी काँग्रेस ४१
उद्धव ठाकरे गट २०
काँग्रेस १६
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १०
समाजवादी पक्ष २
इतर १०
इतर १० जणांपैकी जनसुराज्य शक्तीचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचा १ अशा पाच सदस्यांनी राज्यातील महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. तर समाजवादी पक्षाचे २, एमआयएमचा १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा १, शेतकरी कामगार पक्षाचा १ अशा पाच जणांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाच इतर मिळून २३५ आमदारांची महायुती सत्तेत आहे. तर ५१ आमदार विरोधात आहेत.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…