Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! महिलांनो घराबाहेर पडताना रहा सतर्क

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून  गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच पुण्यात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरटे महिलांना सॉफ्ट टार्गेट करत असून त्यांना लुबाडत आहेत.



पुण्यात कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. एका ठिकाणी मंगळसूत्र लंपास केलं, तर दुसऱ्या ठिकाणी गळ्यातील चैन हिसकावली आहे. काल सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास कर्वेनगरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेची गळ्यातील चैन हिसकावली आहे. या घटनेचे सी सी टिव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्‍या ज्येष्ठ महिलेची चैन चोरून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला असता चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेल्याचे दिसत आहे.


तर दुसरी घटना कोथरूडमध्ये घडली आहे. कोथरूड भागातील डी पी रस्त्यावर असलेल्या नचिकेत सोसायटी मध्ये ही घटना घडली. एक दाम्पत्य सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शतपावली करून घरी परतत होते. त्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या २ जणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवली. पतीने त्यांना पकडायचा प्रयत्न केला मात्र दुचाकीवर असल्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. याबाबत पोलिसात त्यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


दरम्यान, चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांना कसलेच भय उरले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत असताना याबाबत पोलिसांकडून काय पावले उचलली जाणार अशी चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना