गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले

मुंबई : कुर्ला येथील अपघातानंतर चर्चांच्या फैरी झडल्या असल्या तरी बेस्टच्या बसेसचे अपघात आटोक्यात आलेले नाहीत. बेस्टच्या भाडेतत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. गोराई आगाराच्या परिसरात मंगळवारी अशाच एका अपघातात एका तरुणाचा जीव गेला. गोराई परिसरात बेस्टच्या बसचा या महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.


बेस्टच्या भाडेतत्वावरील गाडीला कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातानंतर बेस्टच्या अपघातांच्या अनेक घटना बाहेर येऊ लागल्या आहेत. गोराई परिसरातही बेस्टच्या भाडेतत्वावरील बसने अपघात केल्याच्या तीन घटना या महिन्यात घडल्या आहेत. त्यातच मंगळवारी २१ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका तरुणाने जीव गमावल्यामुळे या अपघातांचे गांभीर्य वाढले आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली आल्यामुळे याच परिसरात राहणाऱ्या वैभव कांबळे याचा मृत्यू ओढवला.



गोराई बसआगाराच्या लगत आकाशवाणी जवळ एल टी मार्ग येथे मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. यावेळी दुचाकीला बेस्टच्या बसगाडीची धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि दुचाकीस्वार बसच्या मागील चाकात येऊन त्याचा अपघात झाला. वैभव हा याच परिसरातील नंदनवन इमारतीत राहत होता. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्यांच्या कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

ब्लॅकमेल ऑपरेशन : जस्ट डायलद्वारे मसाज करायचंय, तर हे पहाच!

न्यूड व्हिडिओच्या धमकीने हायकोर्टाच्या वकिलाला ब्लॅकमेल करणारे भामटे गजाआड मुंबई : एका ६३ वर्षीय उच्च

मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली

मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा कोलमडली मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!

धरणांमध्ये ९९.१३ टक्के पाणीसाठा मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये

शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगदा मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट

एसटी बस आगारांचा १३ हजार एकर भूखंड ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देणार!

परिवहन महामंडळाचे कुर्ला, बोरिवली, राज्यातील इतर शहरांमध्ये भूखंड मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या राज्यातील बस

लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आणखी एक चांगली बातमी...

दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार मुंबई : मुंबईत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी