राज्यातील तापमानात चढ - उतार कायम 

मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे.आज(२१ जानेवारी) पुण्यातील तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून पुढील काही दिवसांत यात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यात आज(२१ जानेवारी) रोजी आकाश मुख्यतः निरभ्र असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता असून पुणेकरांना पुन्हा एकदा गारठा जाणवणार आहे.काही भागात गारठा कायम असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात १-३ अंशांनी घट झाली आहे.


दरम्यान,हवामान विभागाने आता महाराष्ट्रात तापमान वाढणार असल्याचे सांगितले आहे.राज्याच्या तापमानात हलका बदल होत असून सध्या श्रीलंका आणि तमिळनाडू समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. हे चक्राकार वारे सध्या राजस्थान आणि परिसरात सक्रीय आहेत. दक्षिणेकडील राज्यात सध्या तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसात तापमानात चढ - उतार होत आहे.त्यामुळे तापमानात बदल होत असून राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान होते.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे