Sagrika Ghatge : अभिनेत्री सागरिका घाटगेचं तब्बल ५ वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक

मुंबई : मराठी आणो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री लग्नानंतर मोठ्या आणि छोट्या पडद्यावरून दूर जातात. त्यानंतर काही अभिनेत्री कमबॅक करतात.अशीच लग्नानंतर करिअरपासून दुरावलेली लोकप्रिय अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.





राज घराण्यातुन आलेल्या सागरिकाने भारतीय क्रिकेटपटूसोबत लग्न केलं होतं. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सागरिका ५ वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ती 'ललाट' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाच्या सेटवरील फोटो सागरिकाने शेअर केलेत.सागरिका घाटगे या लूकमध्ये ओळखूच येत नाहीये. सागरिकाने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केलाय. या फोटोंमध्ये ती बंजारा समाजाच्या महिलांच्या लूकमध्ये दिसत आहे.



सागरिका घाटगे क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी आहे. दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. सागरिकाने 'चक दे' या चित्रपटात लक्षवेधी भूमिका केली होती. त्यानंतर ती अतुल कुलकर्णी यांच्यासोबत 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटात दिसली होती. सागरिका घाटगे २०२० मध्ये 'फूटपायरी' या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर पाच वर्षांनी ती आता ललाट सिनेमात दिसणार आहे.

Comments
Add Comment

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी मैत्री

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.