Tuesday, May 20, 2025

देशमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Yogesh Mahajan Death : कलाविश्वात शोककळा! अभिनेते योगेश महाजन यांचं निधन

Yogesh Mahajan Death : कलाविश्वात शोककळा! अभिनेते योगेश महाजन यांचं निधन

अहमदाबाद : मराठी मनोरंजन विश्वातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते योगेश महाजन यांचं रविवारी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झालं आहे.हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी योगेश उमरगावमध्ये होते. त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये ते मृतावस्थातेत सापडले. त्यांना हृदयविराचा तीव्र झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते योगेश महाजन हे शनिवारी 'शिव शक्ती-तप, त्याग, तांडव' या हिंदी मालिकेच्या शूटिंगवर होते. शनिवारी संध्याकाळी शूटिंगची शिफ्ट संपताना योगेश यांना प्रकृती अस्वस्थ असल्याचे जाणवले. त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले आणि औषधे घेतली. रात्री हॉटेलमधील रुममध्ये झोपले, पण रविवारी सकाळी शूटिंगसाठी सेटवर पोहोचले नाहीत. त्यानंतर टिममधील लोकांनी त्यांना बरेच कॉल केले, पण त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही.अखेर हॉटेलचा दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडवरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.



अभिनयात कोणताही गॉडफादर नसताना योगेश महाजन यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी मनोरंजन विश्वात आपले नाव कमावले. मनोरंजन विश्वाकडे वळण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात होते. भोजपुरीमधून त्यांची अभिनयात एन्ट्री झाली. हिरवं कुंकू, भंडारा प्रेमाचा, संसाराची माया सारख्या मराठी चित्रपटात योगेशने काम केलं होतं. त्याचप्रमाणे अनेक धार्मिक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.

Comments
Add Comment