मुंबई : ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे (एमएमआर) मध्ये घरांच्या विक्रीत ३१ टक्क्यांची घट झाली. तसेच नवीन प्रकल्पही कमी झाले असल्याचे ‘प्रॉपटायगर डॉटकॉम’च्या अहवालातून निदर्शनास आले आहे. मालमत्तांच्या वाढत्या किंमती हे घरांच्या खरेदीत घट होण्यामागचे सर्वात मोठे कारण असल्याचे मत ‘प्रॉपटायगर डॉटकॉम’ने त्यांच्या अहवालात व्यक्त केले आहे.
अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही, हत्या; मारेकरी पोलिसांना होणार शिक्षा
महाराष्ट्राचा भारताच्या रेसिडेन्शियल मार्केटमध्ये मोठा वाटा आहे. यामुळेच महाराष्ट्रातील घरांच्या खरेदीतील घटीचा परिणाम देशातील घर खरेदीच्या आकडेवारीत प्रतिबिंबित झाला आहे. दिल्ली एनसीआर वगळता देशभरात घरांच्या विक्रीत घट झाली आहे.
निवडणुका, निवडणुकांच्या निमित्ताने लागू झालेली आचारसंहिता आणि राजकीय निर्णय प्रक्रियेवर निवडणुकांचा असलेला प्रभाव यामुळे २०२४ मध्ये घर खरेदीत घट झाली. ज्या तिमाहीत निवडणूक होती त्या कालावधीत घरांच्या खरेदी ३९ टक्क्यांची घट दिसून आली. राज्यातील निवडणुकांमुळे प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया मंदावली आणि त्याचा परिणाम घरांच्या खरेदीवर झाला. अहवालात समाविष्ट असलेल्या आठ पैकी पाच शहरांमध्ये २०२४ च्या अंतिम तिमाहीत नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध होण्याच्या प्रमाणात घट झाली.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे
ऑक्टोबर-डिसेंबर या सणासुदीच्या मोसमात मागील तिमाहीच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे, परंतु विक्री आणि नवीन लॉन्चिंग या दोन्ही बाबतीत मागील वर्षाच्या या कालखंडाशी तुलना केल्यास बहुतांशी भागांमध्ये घट झाल्याचेच दिसून येते. जागतिक आर्थिक अनिश्चितता, मुख्य राज्यांमधील निवडणुका आणि देशभरात मालमत्तेच्या किंमतीत झालेली वाढ या घटकांमुळे विकासक आणि खरेदीदार या दोघांनी थांबून प्रतीक्षा करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते; असे हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे सीईओ ध्रुव अग्रवाल म्हणाले. दिल्ली एनसीआर हे घरांच्या विक्रीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत वृद्धी दाखवणारे एकमेव मार्केट ठरले. एमएमआर, पुणे आणि बंगळूर या मोठ्या बाजारपेठांसहित इतर प्रांतांमध्ये घरांच्या विक्रीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. व्याज दारांत घट होण्याची शक्यता इतक्यात दिसत नसल्याने आगामी तिमाहींमध्ये मार्केट सावध राहील अशी शक्यता असल्याचे ध्रुव अग्रवाल म्हणाले.