Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChandrashekhar Bawankule : पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत, काही कुरबुरी असतील त्यावर चर्चेतून मार्ग निघेल, अशी स्पष्टोक्ती महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सातारा, संभाजीनगर, यवतमाळ येथे आमचे मंत्री असतानासुद्धा शिवसेनेला पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालवावे लागते. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्याची मागणी असल्याने निर्णय घेण्यात आला, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Rishabh Pant LSG Captain : ऋषभ पंत बनला लखनऊ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

सत्ता न मिळाल्याने विरोधक अस्वस्थ

सत्ता न मिळाल्याने विरोधक अस्वस्थ असून, त्यांचा मानसिक पराभव झाला आहे. त्यामुळेच विरोधक सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे तसेच बीड आणि परभणी येथील घटनांचे राजकारण करत आहेत. वास्तविक, अशा घटनांचे कोणीही अजिबात राजकारण करू नये. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी आमच्या महायुतीकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपली महाविकास आघाडी कशी टिकेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचा टोलाही या वेळी लगावला.

…त्यावेळी महाराष्ट्र अशांत केला जातो

ज्या ज्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते त्या त्या वेळी काही घटकांकडून महाराष्ट्र अशांत केला जातो, असेही बावनकुळे यांनी सांगितले. पण, विरोधकांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे याला पुरून उरतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

समन्वय बैठक नेहमीचीच

संघाबरोबरच्या समन्वय बैठकीबाबत विचारले असता, ही बैठक नेहमीच असून, यात विचार परिवारात काम करणाऱ्या संस्थांबरोबर समन्वय साधला जातो. यामध्ये विचार परिवारातील आदिवासी, मागास तसेच भटके-विमुक्त समाजात काम करणाऱ्या संस्था समाजातल्या शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी काही मुद्दे, कल्पना मांडत असतात. सरकारमध्ये काम करत असताना अशा घटकांना न्याय देण्यासाठी कसा आराखडा ठरवता येईल, याबाबत चर्चा होत असते.

तीर्थदर्शन योजनेबाबत जनजागृती गरजेची

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज असून, आमचे सरकार लवकरच या योजनेला व्यापक प्रसिद्धी देऊन जनजागृती करणार आहे. या बाबत ज्या संस्थांना ही योजना राबवायची आहे त्यांनी पुढाकार घेऊन सरकारशी संपर्क साधावा. नुकतेच आमच्या कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानने या योजनेच्या माध्यमातून अनेक भाविकांनी अयोध्या येथील रामलल्लाचे दर्शन घडवले, अशी माहितीही त्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -