Friday, May 9, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: थंडीच्या दिवसांत आजारी होण्यापासून वाचवतात हे पदार्थ

Health: थंडीच्या दिवसांत आजारी होण्यापासून वाचवतात हे पदार्थ

मुंबई: थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे आव्हानात्मक असते. या मोसमात थोडासा तरी निष्काळजीपणा केला तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशातच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच थंडीत अशा काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे शरीर आतून गरम राहण्यास मदत होईल.



हिरव्या पालेभाज्या


थंडीत पालक, मेथी आणि बऱ्याच हिरव्या पालेभाज्या बाजारात येतात. यांचे भरपूर सेवन केले पाहिजे. या हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढू लागते. यात व्हिटामिन केही असते ज्यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत.तसेच व्हिटामिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. या भाज्या अँटीऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत आहे यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेमध्ये ओलावा कायम राहतो.



कंदमुळे


थंडीच्या दिवसांत कंदमुळे जसे गाजर, बीट, शलगम, रताळे, मुळा मोठ्या प्रमाणात असतात. यात बीटा कॅरोटीन आणि व्हिटामिन सी आणि ए सारखी पोषकतत्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास संभवतो.



आंबट फळे


व्हिटामिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच यामुळे मूडही चांगला राहण्यास मदत होते. संत्री, द्राक्षे आणि लिंबासारखी आंबट फळांमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय स्ट्रॉबेरी, किवीमध्येही व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते.


थंडीच्या दिवसांत उन्हाच्या कमतरतेमुळे शरीरातील व्हिटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटामिन डीयुक्त पदार्थ खाणे गरजेचे असते. सालमन फिश हा व्हिटामिन डीचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय दूध, मटण तसेच मशरूमच्या माध्यमातून व्हिटामिन डी मिळते.

Comments
Add Comment