Nitesh Rane : सरकारच्या माध्यमातून भजनी कलाकारांना मानधन दिले जाईल - मंत्री नितेश राणे

  95

मुंबई : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाने आज माटुंगा येथे आयोजित केलेल्या 'अखिल भारतीय भजन संमेलन २०२५' या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते.
कोकणात डबलबारी भजनाला मोठी लोकप्रियता आहे. कोकणवासियांनी दिलेल्या पाठिंब्याने आज महायुती सरकार भक्कमपणे उभे आहे. हे सरकार आपल्या हक्काचे सरकार आहे.



भजनी बुवांना मानधन असेल, भजन भवन असेल आदी प्रश्न सोडवून भजनी कलाकारांना या सरकारच्या माध्यमातून भरभरून दिले जाईल, असे यावेळी बोलताना ते म्हणाले. यावेळी स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध भजनकार अध्यक्ष भगवान लोकरे, सचिव प्रमोद हर्याण, पत्रकार कमलेश सुतार, ज्येष्ठ भजनी बुवा विजय परब, रामदास कासले, गोपीनाथ बागवे, श्रीधर मुणगेकर, संतोष कानडे, प्रकाश पारकर यांसहित इतर भजनी बुवा, भजनी कलाकार उपस्थित होते.

Comments
Add Comment

दादर परिसरातील कबुतरांचे अन्यत्र स्थलांतर!

सोलो इमारत, पिंपळाच्या झाडांवरील वास्तव्य कमी लोकांच्या अंगावर होणारा विष्ठेचा अभिषेकही थांबला मुंबई :

सिक्रेट लॉकचा पर्दाफाश; हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची धडक कारवाई, ५ बारबालांची सुटका

मुंबई : पनवेलसह मुंबईत डान्सबार सर्रास सुरू असल्याची अनेकदा प्रकरणं समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी तर थेट

Mumbai High Court: बाणगंगेत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन नाही, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन करू देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

जीएसटी स्लॅब बदलांमुळे दिलासा : एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेतील ताज्या बदलांना

भुजबळांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

"जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही.":  मुख्यमंत्री मुंबई:

टायगर मेमनच्या नातेवाईकांचा फ्लॅटवरील हक्क कोर्टाने फेटाळला

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका