सैफवर चाकूहल्ला करणारा बांगलादेशी कुस्तीपटू

Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूहल्ला करणारा बांगलादेशचा कुस्तीपटू आहे. त्याने बांगलादेशमध्ये हलक्या वजनाच्या श्रेणीत (लाईट वेट) जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवर कुस्तीच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. ही माहिती पोलीस चौकशीतून समजली आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी मोहम्मदला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत मोहम्मदकडून मुंबई पोलिसांना नवी माहिती मिळाली आहे.

आर्थिक अडचणी वाढू लागल्यामुळे मोहम्मद नोकरी करत होता. या नोकरी दरम्यान एका रिक्षावाल्याशी गप्पा मारताना मोहम्मदला सेलिब्रेटींच्या घरी दरोडा टाकण्याची कल्पना सुचली. यानंतर मोहम्मदने मुंबईत फिरुन शाहरुख खान, सैफ अली खान यांच्यासह निवडक सेलिब्रेटींच्या घरांची लांबून पाहणी केली होती. कोणत्या घरात कोणत्या मार्गाने प्रवेश करावा याचे नियोजन करण्यासाठी मोहम्मदने वेगवेगळ्या भागांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी मोहम्मदच्या मोबाईलची तपासणी सुरू केली आहे. गुन्ह्याचे नियोजन, नेमकी घडलेली घटना आणि त्यानंतर ठाण्यात अटक होईपर्यंतचा घटनाक्रम याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याची कसून चौकशी सुरू केली आहे.

मोहम्मद भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता. या नोकरीत असतानाच त्याला गुन्हा करण्याची कल्पना सुचली. सैफच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मोहम्मदने घरातून बाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत अखेर ठाणे गाठले. या दरम्यान मोहम्मदने वारंवार कपडे बदलले होते. पण पोलिसांनी हाती आलेल्या माहितीच्या मदतीने मोहम्मदला ठाण्याच्या कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडुपातून अटक केली. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील ‘रिकीज’ बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

6 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

9 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

9 hours ago