अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही, हत्या; मारेकरी पोलिसांना होणार शिक्षा

मुंबई : बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेची हत्या झाली. पोलिसांनी एन्काउंटरचा बनाव रचून आरोपी अक्षय शिंदेची हत्या केली; असा अहवाल ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे दोषी असलेल्या पाच पोलिसांविरोधात आरोपीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.



अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. फॉरेन्सिकचा या संदर्भातला अहवाल आल्यानंतर ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.



अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याची कच्चा कैदी म्हणून तळोजा कारागृहात रवानगी झाली होती. पण एका चौकशीसाठी पोलिसांना अक्षयचा पुन्हा ताबा हवा होता. पोलिसांनी कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करुन परवानगी घेतली. यानंतर पोलिसांनी कारागृहातून अक्षयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक तपासाच्या कामासाठी एका ठिकाणाच्या दिशेने निघाले. या प्रवासादरम्यान संधी साधून अक्षयने एका पोलिसाचे शस्त्र ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षात स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला हा दावाच संशयास्पद आहे, असे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल देताना आधार म्हणून त्यांनी फॉरेन्सिकचा अहवाल सोबत जोडला आहे. अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, असे फॉरेन्सिकचा अहवाल सांगतो. यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसांच्या दाव्याविषयी शंका उपस्थित केली. न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल आणि फॉरेन्सिकचा अहवाल यांची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयात न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांनी पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.
Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या