BMC : आयुक्त पोहोचले कांदिवलीत महापालिका अधिकाऱ्यांना धीर द्यायला

- पिझ्झा दुकान आणि दुचाकी दुकानांवर कारवाईचे दिले आदेश


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


कांदिवली परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करतेवेळी जमावाने महागरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणप्रकरणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रविवारी ८ मार्च २०२६ रोजीप्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, कारवाई करणाऱ्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने, पदपथांवर निर्माण झालेले अडथळे हे महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी प्रत्यक्ष उभे राहून निष्कासित करायला लावले. तसेच, डिलिव्हरीच्या दुचाकी उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पिझ्झा दुकानाला तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.


उपायुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर दक्षिण विभाग) आरती गोळेकर, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.


मुबईतील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. याच अनुषंगाने, कांदिवली येथील विश्वकर्मण्ये चौक (लोखंडवाला सर्कल) परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या आर (दक्षिण) विभागाकडून शनिवारी ७ मार्च २०२६) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना जमावाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. तसेच, संयंत्रे आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज कांदिवली येथील विश्वकर्मण्ये चौक (लोखंडवाला सर्कल) परिसरात भेट देऊन पाहणी केली.



गगराणी यावेळी म्हणाले की, अनधिकृत फेरीवाले आणि पदपथावर अनधिकृतपणे करण्यात येणाऱ्या बांधकामांमुळे वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण होतो. तथापि, महानगरपालिकेकडून त्यांच्याविरोधात सातत्याने कारवाई केली जाते. मात्र, नियमानुसार कारवाई करून सेवा बजावणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ला करणे हे निंदनीय आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या जमावात अनधिकृत फेरीवाल्यांसोबत काही स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या संबंधित महाविद्यालयांना याबाबत सूचना देऊन कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



दरम्यान, वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण करणारे अनधिकृत फेरीवाले आणि पदपथावर अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांविरोधी निष्कासनाची कारवाई यापुढेहीसुरूच राहील, असेही गगराणी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments

Sanjay Sakpal    March 12, 2026 10:33 AM

बहुत अच्छा काम किया है उन्होंने निवेदन मेंने है संजय सकपाळ अध्यक्ष प्रत्रकार बहुजन समाज संघ बुध्दिस्ट रिसर्च सेंटर फॉर भारत सेंटर फॉर भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई व्यसनमुक्त युवक अभियान

मनीषा पाटोळे    March 9, 2026 01:18 AM

अनधिकृत बांधकामाना आळा बसलाच पाहिजे.

Add Comment

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील