मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्यास होणार १९ कोटींचा खर्च

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी मार्गावर तसेच दुभाजकाच्या छताचे काम करण्यात येणार असून यासाठी तब्बल सुमारे १९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकल्प कामातील या भुयारी मार्गाचे छत उभारण्याची आठवण महापालिकेला आता झाली आणि याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून करून घेतले जात आहे.


महापालिकेने प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत असलेल्या मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे काम तीन भागांत विभागून हाती घेतले आहे. त्यातील भाग-२ च्या कामासाठी मेसर्स एच.सी.सी. – एच.डी.सी. (संयुक्त भागीदार) या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी १६ ऑक्टोबर २०१८ पासून कामाला सुरुवात केली होती. सध्या या कामाचे सुमारे ९८.८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे सर्वसाधारण सल्लागार म्हणून एईकॉम इंडिया लिमिटेड तर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून इजिस इंडिया कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा. लि. आणि केलिन ग्रुमिट अँड रो (यूके) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, २८ डिसेंबर २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्तांनी प्रकल्पाची स्थळपाहणी केल्यानंतर पदपथ, सायकल ट्रॅक व प्रोमेनेडच्या सुशोभिकरणामध्ये सातत्य राखण्यासाठी काही सुधारणा सुचविण्यात आल्या. त्यानुसार पादचारी भुयारी मार्गांच्या प्रवेश-निर्गमन भागांवर नवीन छत उभारणे तसेच सुशोभिकरणाची संकल्पना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.


या संदर्भात कंत्राटदार व सल्लागारांमध्ये खर्चाबाबत विविध टप्प्यांवर चर्चा व पुनर्मूल्यांकन करण्यात आले. शेवटी सर्वसाधारण सल्लागारांनी १९,.०१ कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला आहे. या कामासाठी आवश्यक स्टील उपलब्ध नसल्याने पर्यायी पाईप व पोकळ पाईप वापरण्यालाही संमती देण्यात आली आहे.या अतिरिक्त कामांमुळे किनारी रस्त्यावरील पादचारी सुविधा अधिक सुरक्षित व आकर्षक होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)