गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्या दोन नव्या ई-स्कूटर्स

मुंबई : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स कंपनीने भारत मोबिलिटी ग्‍लोबल शो २०२५ मध्‍ये दोन नवीन ई-स्कूटर्सचे अनावरण केले. इब्‍लू फिओ झेड, इब्‍लू फिओ डीएक्‍सचे अनावरण केले आणि इब्‍लू रोझी इको लाँच केली. इब्‍लू रोझी इकोची किंमत दोन लाख ९५ हजार ९९९ रुपये आहे. इब्‍लू फिओ झेड शहरातील लहान अंतराच्या प्रवासासाठी लो-स्‍पीड स्‍कूटर म्‍हणून डिझाइन करण्‍यात आली आहे, तर इब्‍लू फिओ डीएक्‍स उच्‍च दर्जाच्‍या परफॉर्मन्‍स क्षमता आणि प्रतिचार्ज जवळपास १५० किमीच्‍या विस्‍तारित रेंजसह वरचढ ठरते. तीनचाकी (एल५एम श्रेणी) इब्‍लू रोझी इको रेंजसोबत लास्‍ट-माइल कनेक्‍टीव्‍हीटी देते. रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग, प्रगत बॅटरी व्‍यवस्‍थापन सिस्‍टम्‍स आणि उच्‍च दर्जाच्‍या बिल्‍ड क्‍वॉलिटीसह या तीन वेईकल्‍स भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेच्‍या भविष्‍याचे प्रतिनिधीत्‍व करतात, असे गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्‍हणाले.



इब्‍लू फिओ डीक्स: नेक्‍स्‍ट-जनरेशन राइड:

इब्‍लू फिओ डीएक्‍स प्रीमियम इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली ५.० केडब्‍ल्‍यू सर्वोच्‍च पॉवर मोटर आहे, जिला १४० एनएम सर्वोच्‍च टॉर्क आहे. ही स्‍कूटर ८० किमी/तास अव्‍वल गती आणि १५० किमीची रेंज देते. तसेच या स्‍कूटरमध्‍ये ११-डिग्री ग्रेडिएण्‍टचा सपोर्ट आहे. या स्‍कूटरमध्‍ये तीन ड्रायव्हिंग मोड्स (इकोनॉमी/नॉर्मल/पॉवर), पूर्णत: लोडेड ७-इंच टीएफटी स्क्रिनसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आहे. स्‍कूटरमध्‍ये २८-लीटर बूट स्‍पेस आहे आणि या स्‍कूटरमधील ४.२ केडब्‍ल्‍यू बॅटरी ६० व्होल्‍ट २० अॅम्पियर होम चार्जरचा वापर करत फक्‍त साडेतीन तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होऊ शकते.



इब्‍लू फिओ झेड: दर्जात्‍मक विश्‍वसनीयतेसह फॅमिली वेईकल:

इब्‍लू फिओ झेड भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली विश्‍वसनीय इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये एैसपैस २५-लिटर बूट स्‍पेस आहे. तसेच, या स्‍कूटरमध्‍ये ड्युअल एलईडी लायटिंगसह डिटॅचेबल एलएमएफपी सिलिंड्रिकल बॅटरी सिस्‍टम (४८ व्‍होल्‍ट/३०एएच) आहे, जी प्रतिचार्ज ८० किमीची रेंज देते. ही स्‍कूटर वेईकलवर ३ वर्ष/३०,००० किमी आणि बॅटरीवर ५ वर्ष/५०,००० किमीच्‍या सर्वसमावेशक वॉरंटी पॅकेजसह येते.



इब्‍लू रोझी इको: उच्‍च-कार्यक्षम सोबती:

१५० एएच लि-आयन बॅटरी असलेली शक्तिशाली व पैशांचे मोल देणारी तीन-चाकी इब्‍लू रोझी इको सिंगल चार्जमध्‍ये १२० किमीहून अधिक अंतरापर्यंत रेंज देते. या वेईकलमध्‍ये शक्तिशाली स्‍टील स्‍केलेटल फ्रेम, सर्व व्‍हील्‍सवर हायड्रॉलिक ब्रेक्‍स आणि ड्रायव्‍हर व तिन्‍ही प्रवाशांसाठी आरामदायी सीट्स आहेत. वेईकलची ७.८ केडब्‍ल्‍यूएच पॉवर-पॅक बॅटरी ५८.४ व्‍होल्‍ट ४० अॅम्पियर चार्जरच्‍या माध्‍यमातून फक्‍त साडेतीन तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते, ज्‍यामधून विविध स्थितींमध्‍ये विश्‍वसनीय कार्यक्षमतेची खात्री मिळते.
Comments
Add Comment

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर! मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ! महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या