Kho Kho World cup 2025: भारताच्या पोरी हुश्शार...भारतीय महिला संघाने जिंकला खो खो विश्वचषक २०२५

  144

नवी दिल्ली: खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय महिला संघाने नेपाळला ७८-४० असे हरवत वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला आहे. सुरूवातीपासूनच भारताच्या मुलींनी कमालीचे प्रदर्शन केले. फायनल सामन्यात त्यांनी नेपाळला गुडघे टेकायला भाग पाडले आणि भारताचा झेंडा गर्वाने फडकवला. प्रियंगा इंगळेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या खेळात इतिहास रचला आहे.



भारताचे जबरदस्त आक्रमण


भारतीय महिला संघ आणि नेपाळच्या संघामध्ये खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्याच्या स्कोरकार्डवर एक नजर टाकल्यास सुरूवातीपासूनच टीम इंडियाचे आक्रमण जबरदस्त होते. नेपाळच्या कर्णधाराने टॉस जिंकत पहिल्यांदा बचावात्मक भूमिका ङेतली. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. पहिल्या टर्नममध्ये भारताच्या खेळाडूंनी नेपाळच्या बचावात्मक भूमिकेला हाणून पाडत ३४ गुण मिळवले. भारतीय संघाने नेपाळच्या ६ बॅच बाद केल्या.



दुसऱ्या टर्नमध्ये बचाव करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे नेपाळला चांगलेच दमवले. भारतानेही दुसऱ्या टर्नमध्ये बचावातून ड्रीम रनच्या मदतीने १ गुण मिळवला. तर नेपाळच्या आक्रमणाने २२ गुण मिळवले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमण करताना कमाल केली. त्यांनी नेपाळला सामन्यातूनच बाहेर केले आणि ३८ गुण मिळवले. नेपाळला यावेळी बचाव करताना एकही गुण मिळाला नाही.



नेपाळला संधी नाहीच


अखेरच्या सामन्यातही टीम इंडियाने तेच केले जे त्यांनी पहिल्या सामन्यापासून केले. संपूर्ण सामन्यादरम्यान त्यांनी नेपाळला पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि विश्वजेता बनले. त्यांनी सलग ६ सामने जिंकत खोखो विश्वचषक २०२५ची ट्रॉफी उचलली.


Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे