Manu Bhaker : खेलरत्न विजेत्या मनू भाकरच्या आनंदावर विरजण; नातलगांचा अपघाती मृत्यू!

नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर (Manu Bhaker) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही स्कूटीवरुन जात असताना अचानक एका गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मनू भाकरचे मामा युद्धवीर सिंग हे रोडवेजमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यांचे महेंद्रगड बायपासवर घर आहे. ते आज नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले. त्याच वेळी मनूची आजी सावित्री देवी यांना त्यांच्या लहान मुलाच्या घरी लोहारु चौकात जायचे होते. त्यामुळे युद्धवीर यांनी त्यांच्या आईला दुचाकीवर बसण्यास सांगितले आणि ते एकत्र निघाले. मनू भाकरचे मामा हे दुचाकी चालवत कालियाना वळणाजवळ आले. त्याचवेळी समोरुन भरधाव वेगात कार येताना दिसली. हा कार उलट दिशेने येत होती आणि तिचा वेग प्रचंड होता. यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानतंर ती कार थेट मनू भाकर यांच्या दुचाकीला जाऊन आदळली.


यावेळी युद्धवीर सिंग आणि सावित्री देवी हे रस्त्यावर पडून जखमी झाले. तर भरधाव वेगात येणारी कार ही रस्त्याच्या कडेला उलटी झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मनू भाकरचे मामा आणि आजीचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून आरोपींचा शोध घेत आहे.

Comments
Add Comment

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास