आमदार कालिदास कोळंबकरांचा विश्वविक्रम

  192

मुंबई : सलग नऊ वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी विश्वविक्रमाची नोंद केली आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया या संस्थेने विश्वविक्रम धारक म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांची नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार कालिदास कोळंबकरांचा पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.



दिवंगत आमदार गणपतराव देशमुख सोलापूरच्या सांगोल्यातून १० वेळा विजयी झाले होते. पण त्यांना हे विजय सलग मिळवता आलेले नाहीत. या उलट कालिदास कोळंबकर यांनी सलग नऊ वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु करणाऱ्या कोळंबकर यांनी २००५ मध्ये नारायण राणेंसोबत सेना सोडली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. २०१९ मध्ये ते भाजपकडून निवडून आले. यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा ते भाजपाकडून निवडून आले.



वडाळा मतदारसंघात मराठी मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय मुस्लिम, पारशी, दलित मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. कोळंबकर यांनी पहिल्यांदा शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून ते अपराजित आहेत. तेव्हा ते नायगाव मतदारसंघातून विजयी झाले होते. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून कोळंबकर वडाळ्यातून विजयी होत आले आहेत.
Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी