मुंबई : राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम) ही मुंबईसह देशातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे, ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात तर केईएमचे नाव अग्रगण्य आहे. केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षामध्ये पदार्पण केले असून हे वर्ष अधिकाधिक समाज उपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित आणि परळ स्थित सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम) चा शताब्दी वर्ष शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक आज (दिनांक १८ जानेवारी २०२५) पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
व्यासपीठावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, स्थानिक आमदार अजय चौधरी, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत आदी उपस्थित होते.
केईएम रुग्णालयाच्या १०० वर्षांच्या काळात संस्थेसाठी समर्पणवृत्तीने कामकाज करणाऱ्या लोकांना धन्यवाद देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करीत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे, हे धोरण राज्याने स्वीकारले आहे. त्यानुसार मागील एक वर्षात दहा नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय राज्यात सुरू करण्यात आली आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी खूप चांगली वैद्यकीय सेवा पुरवली. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांचे कामकाज निश्चितच कौतुकास्पद होते. केईएम हे कुटुंब आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते, हे संस्थेला अभिमानास्पद आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी २१ मजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले आहे, संस्थेचा पायाभूत विस्तार यापुढे होत राहो, अशा शुभेच्छा देखील मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केल्या.
केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे, रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठी नियोजित एकवीस मजली इमारतीचे भूमिपूजन देखील मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. केईएम रुग्णालयाच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत देखील यावेळी प्रदर्शित करण्यात आली.
रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला डॉक्टर्स, प्राध्यापक तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…