Mere Husband Ki Biwi Movie : 'मेरे हसबंड की बीवी'च्या सेटवर छत कोसळलं अन्...

मुंबई : बॉलिवू़ड मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे अशी की 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना झालीय. चित्रपटाच्या सेटवर अचानक छत कोसळल्याने खळबळजनक वातावरण निर्माण झालंय. यावेळी सेटवर अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज उपस्थित होते. या दुर्घटनेत सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाहीये.


'मेरे हसबंड की बिवी' या चित्रपटाचं मुंबई येथील रॉयल पाम्स इंपेरिअल पॅलेसमध्ये शूटिंग सुरु होतं. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर अचानक छत कोसळलं. शूटिंगदरम्यान मोठा आवाज आल्याने छत कोसळल्याची ही दुर्घटना घडली. यामुळे अर्जुन, भूमी, जॅकी आणि दिग्दर्शक मुदस्सर यांना किरकोळ जखम झाल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटाचं अनेक दिवसांपासून मोठ्या आवाजात इथे शूटिंग होत असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जातंय.



नेमकं काय झालं?


'मेरे हसबंड की बिवी' या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सुरु होतं. पहिल्या दिवशी शूटिंग व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता एका सीनच्या शूटिंगदरम्यान छत अचानक कोसळलं. या सेटवरच्या छतचे तुकडे कोसळल्याने वेळीच सर्वांनी बचाव केला. जर संपूर्ण छत कोसळलं असतं तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु तरीही अनेकांना दुखापत झाली. 'मेरे हसबंड की बिवी' हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर