मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय पुरुष क्रिकेट संघ जाहीर केला आहे. या संघात १५ खेळाडू आहेत. रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. के एल राहुल आणि रिषभ पंत हे दोघे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात असतील. रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रिषभ पंत यांचा फलंदाज म्हणून संघात समावेश झाला आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह यांचा गोलंदाज म्हणून संघात समावेश झाला आहे.
Kho Kho World Cup 2025: खोखो वर्ल्डकप २०२५मध्ये भारत सेमीफायनलमध्ये दाखल
नवी दिल्ली: खोखो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय पुरुष संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफायनलमध्ये भारताने श्रीलंकेला १००-४० असे हरवत ...
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत संघाची निवड झाली. संघ निवडल्यानंतर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली.
BCCIच्या खेळाडूंसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर, पालन केले नाही तर...
मुंबई : बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India - BCCI) खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक यांच्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन केले नाही तर ...
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आयोजक पाकिस्तान आहे. पण खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील निवडक सामने पाकिस्तानमध्ये आणि निवडक सामने दुबईत होणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारी २०२५ रोजी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारी रोजी स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळेल. हा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे.
Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : भारताच्या क्रीडा क्षेत्रातून कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने ...
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आठ आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघांचा समावेश आहे. हे संघ दोन गटाच प्रत्येकी चार या पद्धतीने विभागण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अ गटात आहेत. या गटात न्यूझीलंड आणि बांगलादेश हे दोन संघ पण आहेत. ब गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे चार संघ आहेत. प्रत्येक संघ गटातील उर्वरित तीन संघांसोबत प्रत्येकी एक साखळी सामना खेळेल. यानंतर प्रत्येक गटातील सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. पहिला उपांत्य सामना दुबईत आणि दुसरा उपांत्य सामना लाहोरमध्ये होणार आहे. अंतिम सामना लाहोरमध्ये होणार आहे. पण भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी सामना दुबईत खेळवला जाईल. जो संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल तो संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाच सामने खेळणार. यात तीन साखळी सामने, एक उपांत्य फेरीचा सामना आणि एक अंतिम फेरीचा सामना अशा पाच सामन्यांचा समावेश असेल.
Manu Bhaker : मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली पदके परत करणार; नेमकं कारण काय?
मुंबई : मनू भाकरने (Manu Bhaker) गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) अचूक लक्ष्यभेद करून इतिहास रचला आणि ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली. मात्र आता या ...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, भारतीय संघ
रोहित शर्मा, कर्णधार, फलंदाज
शुभमन गिल, उपकर्णधार, फलंदाज
यशस्वी जयस्वाल, फलंदाज
विराट कोहली, फलंदाज
श्रेयस अय्यर, फलंदाज
के एल राहुल, यष्टीरक्षक, फलंदाज
रिषभ पंत, यष्टीरक्षक, फलंदाज
हार्दिक पांड्या, गोलंदाज
रवींद्र जडेजा, गोलंदाज
वॉशिंग्टन सुंदर, गोलंदाज
अक्षर पटेल, गोलंदाज
कुलदीप यादव, गोलंदाज
जसप्रीत बुमराह, गोलंदाज
मोहम्मद शमी, गोलंदाज
अर्शदीप सिंह, गोलंदाज
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
अ गट - भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, वेळापत्रक
१९ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
२१ फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
२४ फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२७ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
१ मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
२ मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
४ मार्च - उपांत्य सामना १, दुबई
५ मार्च - उपांत्य सामना २, लाहोर
९ मार्च - अंतिम सामना, लाहोर (भारत पात्र ठरल्यास दुबईत)
१० मार्च - राखीव दिवस