Tuesday, February 11, 2025
Homeक्रीडाBCCIच्या खेळाडूंसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर, पालन केले नाही तर...

BCCIच्या खेळाडूंसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर, पालन केले नाही तर…

मुंबई : बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India – BCCI) खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक यांच्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन केले नाही तर संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार बीसीसीआयशी संलग्न असलेल्या सर्व खेळाडूंना बोर्डाने विविध राष्ट्रीय, आंतररराष्ट्रीय आणि आयपीएल स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज राहावे लागेल. जर एखाद्या स्पर्धेसाठी निवड होऊनही संबंधित खेळाडू त्या स्पर्धेत खेळणार नसेल तर त्याला बोर्डाला लेखी स्वरुपात त्याचे कारण कळवावे लागेल. हे कारण समाधानकारक वाटले नाही तर बोर्ड खेळाडूविरोधात शिस्तभंगाची कारवाई करू शकेल. ही कारवाई खेळाडूला दिल्या जाणाऱ्या पैशामध्ये कपातीच्या स्वरुपात असू शकते.

Kho Kho World cup 2025: भारताचा भूतानवर जबरदस्त विजय, टीम इंडिया क्वार्टरफायनलमध्ये

सर्व खेळाडूंना सामने आणि सराव सत्रांसाठी संघासोबतच प्रवास करावा लागेल. या कार्यक्रमात संघ सदस्य बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय स्वेच्छेने बदल करू शकणार नाही. प्रवासात कोणता सदस्य जास्तीत जास्त किती किलो सामान सोबत नेऊ शकतो, याच्यासाठीही बीसीसीआयने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. निवड समितीने निवडलेल्या संघ सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणीही संघासोबत प्रवास करणार असल्यास त्यांना बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल. वैयक्तिक सहाय्यक सोबत न्यायचे असले तरी बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल.

प्रमुख मार्गदर्शक सूचना

  1. बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रीय संघातील निवडीसाठी आणि केंद्रीय करारासाठी पात्र राहण्यासाठी खेळाडूंना देशांतर्गत सामन्यांमध्ये भाग घेणे अनिवार्य. या आदेशातील कोणतेही अपवाद केवळ असाधारण परिस्थितीत विचारात घेतले जातील आणि प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निवड समितीच्या अध्यक्षांकडून औपचारिक अधिसूचना आणि मंजुरी आवश्यक असेल.
  2. सर्व खेळाडूंना सामने आणि सराव सत्रांसाठी संघासोबतच प्रवास करावा लागेल. या कार्यक्रमात संघ सदस्य बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय स्वेच्छेने बदल करू शकणार नाही.
  3. बीसीसीआयच्या सामन्यांसाठी किंवा सराव सत्रांसाठी प्रवास करताना कोणता सदस्य जास्तीत जास्त किती किलो सामान सोबत नेऊ शकतो, याच्यासाठीही बीसीसीआयने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
  4. निवड समितीने निवडलेल्या संघ सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणीही संघासोबत प्रवास करणार असल्यास त्यांना बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल. वैयक्तिक सहाय्यक सोबत न्यायचे असले तरी बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल.
  5. बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पाठवल्या जाणाऱ्या उपकरणे आणि वैयक्तिक वस्तूंबाबत संघ व्यवस्थापनाशी समन्वय साधला पाहिजे. वेगळ्या व्यवस्थेमुळे होणारा कोणताही अतिरिक्त खर्च खेळाडूची जबाबदारी असेल.
  6. मालिका सुरू असताना बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय खासगी शूटिंगमध्ये व्यस्त राहता येणार नाही.
  7. बीसीसीआयच्या अधिकृत कार्यक्रमांसाठी तसेच शूटिंगसाठी खेळाडूंनी उपलब्ध राहणे आणि सहकार्य करणे अपेक्षित आहे.
  8. दीड महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या परदेश दौऱ्यात कुटुंबाला भेटता येईल किंवा काही काळ त्यांच्यासोबत घालवता येईल. पण यासाठी बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक असेल.
  9. बीसीसीआयसोबतच्या कराराचे काटेकोरपणे पालन करणे खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक यांच्यासाठी बंधनकारक असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -