Santosh Deshmukh Murder Case : आंबेजोगाई रोडवरील टोलनाका कि अपहरण केंद्र ??

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी कोण आणि त्याला शिक्षा कधी होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेप्रकरणात पोलिसांचा तपास अजूनही सुरु आहे. मात्र असं असलं तरी ज्या टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच टोलनाक्यावरून २८ मे रोजी आवादा कंपनीचे मॅनेजरचे देखील अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण होऊन त्यांची हत्या करण्यात आली. मात्र या हत्येच्या वादाला जिथून सुरुवात झाली त्या आवादा कंपनीच्या मॅनेजरचे २८ मे रोजी अपहरण झाले होते. हे अपहरण आंबेजोगाई रोडवरील टोलनाक्यावरून झाले होते असल्याची माहिती समोर आली आहे.



देशमुखांच्या हत्येआधी नेमकं काय घडलं ??


६ डिसेंबरला आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे यांना मारहाण केली. त्यामुळे त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र तिथे परत भांडण वाढले आणि यात दोन गटात भांडण झाले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर ९ डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचं टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकर्‍यांनी अपहरण केले. अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी शोध सुरु केला. याच दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला होता. या प्रकरणात ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि