मुलीचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप

  76

पुणे : पतीसोबत भांडण झाल्यावर स्वतःचा मुलीचा खून करणाऱ्या आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईला प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेप आणि दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली.


अनिता संजय साळवे (वय- २५, रा. वारजे, पुणे) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी अनिताचा पती ४ फेब्रुवारी २०१६ रोजी कामावर गेला होता. त्यानंतर अनिताचा पतीशी फोनवर वाद झाला होता. रागाचे भरात तिने स्वत:च्या लहान मुलीचा शालीने नाक तोंड दाबून खून केला. त्यानंतर तिने पंख्याला साडी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता.


याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारजे पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.


या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून २० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. कौटुंबिक वादातून पतीने बोलणे सोडलेले होते, तसेच सासूने दुर्लक्ष केले होते. माझ्यामागे लहान मुलीची जबाबदारी कोण स्वीकारणार, तसेच तिची फरफट होऊ नये म्हणून मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली होती.



आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे निष्पाप बालकाने जीव गमावला असून, तिला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. कौटुंबिक वाद आणि नैराश्यातून तिने मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सरकारी वकील दातरंगे यांनी युक्तिवादात सांगितले. तक्रारदाराकडून ॲड. ए. व्ही. औसेकर यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. सचिन झालटे पाटील यांनी काम पाहिले.


छळ आणि नैराश्यातून आईने मुलीचा खून केल्याची ही घटना दुर्मीळ असून, आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. तिला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक