नवी दिल्ली: भारताच्या खोखो संघाने विश्वचषक २०२५मधील चौथ्या सामन्यात सलग विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष संघाने भूतानला ७१-३४ असे हरवत जबरदस्त विजय मिळवला.
पहिल्या टर्नमध्ये भारताने ३२ गुण मिळवले होते. तर प्रतिस्पर्धी संघ भूतानने केवळ १८ गुण मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या टर्नमध्ये भारताने आपली गुणसंख्या ७१ पर्यंत वाढवली. तर भूतानला केवळ ३४ धावांपर्यंत मजल मारता आली.
या विजयासह खोखो वर्ल्डकप २०२५मध्ये भारतीय पुरुष संघ क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी भारताने तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळला ४२-३७ असे हरवले होते. खरंतर नेपाळने पहिल्या सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ब्राझीलला ६४-३४ असे हरवत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता भारतीय संघाने विजयी हॅटट्रिक लावली आहे. तिसऱ्या सामन्यात त्यांनी पेरूला हरवले. यासोबत भारतीय संघाने ३ सामन्यांतून ६ गुण मिळवले आहेत. भारत ग्रुप ए मध्ये खेळत आहे. यासोबतच भारताने ग्रुप एमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…