Friday, May 23, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी GoodNews, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी!

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी GoodNews, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी!

नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) प्रत्येक १० वर्षांनी वेतन आयोग आणत असतो. सध्या देशात सातवा वेतन आयोग आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न पडत होता. त्यानंतर आता केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ८वा वेतन आयोगामुळे (8th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात मोठी वाढ होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे.



कधी होणार लागू? 


केंद्र सरकार प्रत्येक १० वर्षांनी वेतन आयोग आणत असतो. सध्या देशात सातवा वेतन आयोग आहे. याचा कार्यकाल २०२६ ला संपत आहे. त्याअगोदर अध्यक्ष आणि २ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर २०२६ पर्यंत आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली जाईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा करताना सांगितले. तसेच सध्या सातव्या वेतन आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या आधीच लागू केल्या आहेत. सरकार नंतर आठव्या वेतन आयोगाच्या सदस्यांसह इतर तपशीलांची माहिती देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment