जामखेडमध्ये चारचाकी विहिरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

  49

अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड परिसरातील जांबवाडी येथे रस्त्या लगतच्या विहिरीत चारचाकी वाहन कोसळून झालेल्या अपघातात ४ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.


यासंदर्भातील माहितीनुसार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन थेट विहिरीत जाऊन पडले. त्यामुळे वाहनातील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वाहनात रामहरी गंगाधर शेळके, किशोर मोहन पवार, अशोक विठ्ठल शेळके आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर आदींचा समावेश होता.


अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवकांना उतरवले. त्यांनी बुडालेल्या चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी असलेली गर्दी हटवली.


सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने चारही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे चारही मृतदेह शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनसाठी नेण्यात आले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Teacher Protest: शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य! २० टक्के वाढीव पगार लवकरच खात्यात जमा होणार

"अधिवेशन संपताच शिक्षकांच्या खात्यावर पैसे": गिरीश महाजन मुंबई: आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक