Rahul Gandhi Exposed : खरा चेहरा समोर आला!

देशविरोधी वक्तव्यावरून अडकले विरोधी पक्षनेते राहुल गांधी


नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि सरकार विरोधात टीका करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आमची लढाई भारताच्या विरोधात असल्याचे गंभीर वक्तव्य केले. यावरून राहुल यांच्यावर चौफेर टीका होत असून त्यांचा खरा चेहरा समोर आल्याचे (Rahul Gandhi Exposed) भाजपाने म्हटले आहे.


अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना वर्षपूर्तीच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते की, “अनेक शतकांपासून शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देणाऱ्या देशाला खऱ्या स्वातंत्र्याची गरज होती, ते या दिवशी प्राप्त झाले.” सरसंघचालकांच्या या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज, बुधवारी चांगलीच आगपाखड केली.





दिल्ली येथे काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधी म्हणाले की, भागवत यांचे विधान देशद्रोही असून ते इतर कुठल्या देशात असते तर त्यांना अटक झाली असती. आपली लढाई आरएसएस, भाजपा आणि भारताच्या विरोधात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. दिल्लीच्या कोटला रोड कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधींनी केलेल्या या विधानामुळे कडाक्याच्या थंडीतही राजकीय पारा प्रचंड चढला आहे.



भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी हे भारताच्या विरोधात असून या कटू सत्याची त्यांनी स्वत: जाहीर कबुली दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, अशा शब्दात भाजपा नेते जगतप्रकाश नड्डा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडले.





यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेसचे कुरूप सत्य त्यांच्याच नेत्याने उघड केले आहे. ते भारताविरुद्ध लढत आहेत हे देशाला माहीत असले तरी त्याची जाहीर कबुली दिल्याबद्दल मी राहुल गांधींचे कौतुक करतो. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे अर्बन नक्षल आणि भारताला बदनाम, अपमानित आणि बदनाम करणाऱ्या डीप स्टेटशी जवळचे संबंध आहेत हे लपून राहिलेले नाही. त्याच्या वारंवार केलेल्या कृतींमुळेही हा विश्वास दृढ झाला झाल्याचे नड्डा यांनी सांगितले.


अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, संविधानावर शपथ घेतलेले विरोधी नेते असे म्हणत आहेत की, ते भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत अशी टीका सीतारामन यांनी केली. तर राहुल गांधींच्या वक्तव्याची काही सेकंदांची व्हिडिओ क्लिप ट्वीटरवर (एक्स) शेअर करत अमित मालवीय म्हणाले की, "राहुल गांधींनी आता भारतीय राजकीय व्यवस्थेविरुद्ध उघड लढा जाहीर केला आहे." हे थेट जॉर्ज सोरोसच्या प्लेबुकमधून आहे," असे मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा