Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीMeta Layoff : मार्क झुकरबर्ग ३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

Meta Layoff : मार्क झुकरबर्ग ३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

नेमकं कारण काय?

मुंबई : एआय (AI) आता प्रत्येक प्रगत क्षेत्रात पुढे चालला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील नागरिकांना एआयचा चांगलाच फायदा होत आहे. परंतु दुसरीकडे एआय टेक्नोलोजीचा फटका देखील बसत चालला आहे. मेटा आता एआय-संचालित सेवा (Al-powered) आणि इमर्सिव्ह डिव्हाइसेस तयारीच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे मेटामधील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका सहन करावा लागणार आहे. (Meta Layoff)

RTE Admission 2025 : आरटीई’ प्रवेश प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपची (WhatsApp) पेरेंट कंपनीने जवळपास ३ हजार ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची (Meta lay off) योजना आखली आहे. त्यामुळे असमाधानकारक कामगिरी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मार्क झुकरबर्ग बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत.

दरम्यान, नोकरकपातबाबत मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले की, हे वर्ष खूप कठीण असेल आणि आमच्या टीममध्ये सर्वोत्तम लोक असतील यात्री खात्री करण्यासाठी नोकरकपात जारी करणार आहे. तसेच नोकरकपातीमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Meta Layoff)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -