

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, नौदलाच्या तीन नौकांचे राष्ट्रार्पण
मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी १५ जानेवारी रोजी पहिल्यांदा मुंबईत येत आहेत. याआधी ते मुख्यमंत्री फडणवीस ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवा दृष्टीकोन दिला. आज त्यांच्या महाराष्ट्रात नौदलाला २१ व्या शतकासाठी सशक्त करण्याच्या दृष्टीने दमदार वाटचाल सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सागरी यात्रा, व्यापार, सागरी संरक्षण, जहाज बांधणी, जल मार्गाने होणारी मालवाहतूक या सर्व क्षेत्रात भारताला समृद्ध इतिहास आहे. या इतिहासातून प्रेरणा घेत भारत अधिकाधिक सशक्त होत आहे. चोल वंशाच्या पराक्रमाला मानवंदना देणारी आयएनएस निलगिरी फ्रिगेट, गुजरातच्या व्यापाऱ्यांनी भारताला पश्चिम आशियाशी जोडले या घटनेची आठवण करुन देणारी आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी या तीन सामर्थ्यशाली नौकांचे राष्ट्रार्पण करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला.

मंत्री नितेश राणेंची सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालयाची मागणी
मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. याप्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक ...
भारताकडे जग एक विश्वासू आणि जबाबदार साथीदार म्हणून बघत आहे. समुद्रात अडचणीत सापडलेल्यांना भारतीय जहाज मदतीला आल्याचे दिसले की धीर येतो. भारताचा भर विस्तारवादावर नाही तर विकासवादावर आहे. भारतानं नेहमी खुल्या, सुरक्षित, सर्वसमावेशक, वैभवशाली इंडो पॅसिफिकचे समर्थन केले. समुद्र किनारा असलेल्या देशांच्या विकासासाठी भारत सागर अर्थात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन हा मंत्र दिला. भारत हाच दृष्टीकोन घेऊन वाटचाल करत आहे. जी २० परिषदेत भारताने जगाला 'वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर' हे सांगितले. भारत सर्वांची सोबत, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास या विचाराने काम करणारा देश आहे आणि यापुढेही याच पद्धतने काम करेल; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.