Emergency Banned In Bangladesh : 'या' देशात 'इमर्जन्सी' चित्रपटाला नो एन्ट्री !

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हा सिनेमा पुढील काही दिवसात रिलीज होणार असून अनेकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकसता आहे. तसेच या चित्रपटात कंगना रणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली असून तिनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कंगनाचा हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, तो वादात अडकला होता. परंतु काही सीन्स कट केल्यानंतर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला. त्यातच आता असे समजते की 'इमर्जन्सी' हा सिनेमा बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणार नाही.



‘या’ कारणामुळे घेतला निर्णय


बांगलादेशमध्ये 'इमर्जन्सी'चे प्रदर्शन होणार नाही. हा निर्णय भारत आणि बांगलादेशमधील सध्याच्या ताणलेल्या संबंधांशी जुडलेला आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात भारताने १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेषतः, शेख मुजीबुर रहमान (बांगलादेशाचे जनक) यांना भारताने दिलेल्या पाठिंब्याची कथा आणि बांगलादेशातील अतिरेकींनी त्यांची हत्या केल्याची घटनाही दाखवण्यात आली आहे, जी बंदीच्या निर्णयामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.



यापूर्वी ‘या’ चित्रपटांवरही बंदी


'इमर्जन्सी' हा बांगलादेशात बंदी घातलेला पहिला भारतीय चित्रपट नाही. यापूर्वी 'पुष्पा २' आणि 'भूल भुलैया ३' सारख्या चित्रपटांनाही बांगलादेशात प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी मैत्री