भारतीय महिलांनी उभारला धावांचा डोंगर

राजकोट : आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला संघाने आयर्लंडच्या महिला संघाविरूद्धच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय महिला संघाने ५० षटकांत पाच बाद ४३५ धावा केल्या. भारताच्या दोन्ही सलामीच्या बॅटरनी शतक साजरे केले तर यष्टीरक्षक फलंदाज रिचाने अर्धशतक केले.



प्रतिका रावलने १२९ चेंडूत एक षटकार आणि २० चौकार मारत १५४ धावा केल्या. कर्णधार असलेल्या स्मृती मंधानाने अवघ्या ८० चेंडूत सात षटकार आणि १२ चौकार मारत १३५ धावा काढल्या. प्रतिकाने ११९.३८ आणि स्मृतीने १६८.७५ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने ४२ चेंडूत एक षटकार आणि १० चौकार मारत ५९ धावा केल्या. रिचाने १४०.४८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तेजल हसबनीसने २५ चेंडूत २८ धावा केल्या. हरलीन देओलने १० चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद ४ तर दीप्ती शर्माने नाबाद ११ धावा केल्या. भारताला २९ अवांतर (एक्स्ट्रॉ) मिळाले.



धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या दोन प्रमुख बॅटर लवकर बाद झाल्या. कर्णधार असलेली गॅबी लुईस फक्त एक धाव करुन बाद झाली. यष्टीरक्षक फलंदाज कुल्टर रेली शून्य धावा करुन बाद झाली. आयर्लंडने १३ षटकांत दोन बाद ८१ धावा केल्या. सारा फोर्ब्स आणि ओरला प्रेंडरगास्ट या दोन बॅटर खेळत आहेत.
Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात