DCM Eknath Shinde : एमएसआरडीसीचे कार्यालय महाबळेश्वरमध्ये सुरू करा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दरे या त्यांच्या मूळगावी आले असता त्यांनी या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा विशेष बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एमएसआरडिसीचे कार्यालय महाबळेश्वर येथे सुरू करावे असे निर्देश यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.



यावेळी नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळाचे विकास प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली असल्याने या भागाचा सुनियोजितपणे विकास करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. त्यांचे कार्यालय साताऱ्यात असल्याने स्थानिकांना तिथे वारंवार जाणे अवघड होत होते. स्थानिक ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय तत्काळ महाबळेश्वरमध्ये सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.


तसेच यावेळी ग्रामस्थांनी कोयना नदीचे पत्रातील पाणी हे स्थिर असल्याने येथे चालवण्यात येणाऱ्या बोटींना समुद्रातील बोटींप्रमाणे नव्हे तर वेगळे नियम लावावेत अशी मागणी केली. तसेच या बोटींना लावण्यात येणारे काही नियम दुरुस्त करून नवीन नियम तयार करावे असे सुचवले. त्याबाबत हे नियम तपासून त्यात आवश्यक ते बदल करावे असे शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.


याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथे कोयना नदीवरील पुलाचे तसेच प्रतापगड आणि तापोळा येथे रस्ता रुंदीकरण आणि पर्यटक गॅलरीचे काम सुरू असून या कामांची प्रगती त्यांनी जाणून घेतली. तसेच या कामांचा वेग वाढवून ती लवकरात लवकर पूर्ण करावी असेही सांगितले.


या गावात नव्याने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळी स्थानिक नागरिकांना उपजीविकेचे साधन मिळावे यासाठी त्याना तात्पुरत्या स्वरूपात तंबूमध्ये होम स्टे उभारण्याची परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम परवानग्या द्याव्यात असेही सांगितले. तसेच कोयना तीरावर बांबू तसेच इतर झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे असेही सांगितले.


यासोबतच प्रतापगड किल्ल्यावर सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने हे काम तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले होते. प्रतापगड हे शिवछत्रपतींची पावनभूमी असल्याने इथे निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याठिकाणी नव्याने होणारे कामही दर्जेदारच व्हायला हवे असेही निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये