नवी दिल्ली: पहिल्यावहिल्या खोखो वर्ल्डकपच्या(Kho Kho World cup 2025) पहिल्याच सामन्यात यजमान भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात नेपाळला ४२-३७ असे हरवले.
भारताने नेपाळविरुद्ध सुरूवातीला टॉस जिंकतच विजयी सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी अटॅकची बाजू घेतली. यावेळेस भारताने पहिल्या टर्नमध्ये २४ पॉईंट मिळवले. त्यानंतर भारताने नेपाळला २० पॉईंट्सवर रोखले.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने पुन्हा आक्रमण करताना २२ गुण मिळवले. त्यामुळे भारताची आघाडी वाढली. त्यानंतर नेपाळचे आक्रमण थोपवताना त्यांना ३७ गुणांवर रोखत आपला पहिला सामना जिंकला.