रशिया - युक्रेन युद्धात भारतीयाचा मृत्यू

नवी दिल्ली : रशिया - युक्रेन युद्धात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि एक भारतीय गंभीर जखमी झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ३२ वर्षांचा बिनिल टी बी रशिया - युक्रेन युद्धात ठार झाला. बिनिलचा नातलग असलेला जैन टी के हा युद्धात गंभीर जखमी झाला. सध्या जैन टी के याच्यावर उपचार सुरू आहेत. बिनिल टी बी आणि जैन टी के हे दोघेही मूळचे केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील वडक्कनचेरीचे रहिवासी आहेत. झटपट भरपूर पैसे कमावण्यासाठी त्यांनी रशियाच्या लष्करात सहाय्यक म्हणून नोकरी करायला सुरुवात केली होती. नोकरीमुळेच ते युद्ध क्षेत्रात वावरत होते.

रशिया सरकारने बिनिल टी बी याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतातील त्याच्या कुटुंबाला कळवली आहे. तसेच जैन टी के हा गंभीर जखमी असल्याचे रशिया सरकारने त्याच्या भारतातील कुटुंबाला कळवले आहे. मॉस्कोतील भारतीय दूतावासाने फोन करुन बिनिलच्या मृत्यूची बातमी त्याची पत्नी जॉयसी हिला कळवली. पण भारत सरकारने अधिकृतरित्या अद्याप बिनिलच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबाला कळवलेली नाही.

रशिया - युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यावर झटपट भरपूर पैसे कमावण्यासाठी केरळमधील अनेक तरुणांनी रशियाच्या सैन्यात वेगवगेळ्या पदांसाठी अर्ज केला होता. यापैकी अनेकजण सध्या युद्ध क्षेत्रात कार्यरत आहेत. या तरुणांबाबतची ठोस आकडेवारी केरळ सरकारने संकलित स्वरुपात जाहीर केलेली नाही. यामुळे नेमके किती तरुण केरळमधून रशियात गेले आहेत आणि तिथून परत येण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या किती मोठी आहे हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत.

बिनिल इलेक्ट्रिशिअन होता, त्याच्यासारख्याच असलेल्या केरळमधील अनेकांनी प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, वायरमन, कुक, ड्रायव्हर अशा प्रकारच्या लष्करी सहाय्यकाच्या जबाबदाऱ्यांसाठी अर्ज केला होता. सुरुवातीला पैशांसाठी गेलेली ही मंडळी युद्ध लांबू लागल्यामुळे आणि दक्षिण भारताच्या तुलनेत प्रतिकूल असलेल्या वातावरणात दीर्घ काळ राहिल्यामुळे मायदेशी परतण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आहे. मुळात लष्करी सेवेत नसल्यामुळे केरळमधून रशियात लष्करी सहाय्यक म्हणून गेलेल्या तरुणांसाठी त्यांची परदेशातली नोकरी ही अवघड जागेचे दुखणे झाली आहे.
Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात