नाशिक : लोखंडी सळ्या घेऊन चाललेल्या ट्रकला टेम्पोने धडक दिल्याने लोखंडी सळ्या शरीरात घुसून चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर रविवारी (दि.१२) रात्री आठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी आहेत.
भक्तीच्या महाकुंभचा आजपासून भव्य शुभारंभ, पहिले शाही स्नान आज
नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन ट्रक चालला होता. मृत झालेली मूल टेम्पोने निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते. परतताना हा टेम्पो उड्डाण पुलावरून द्वारका चौकात उतरत असताना ट्रकला धडकला.आणखी एक भरधाव वाहनही या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकले. या भीषण अपघातात चार जणांच्या शरीरात लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. चौघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय सहा जण जखमी झाले. अपघातानंतर उड्डाणपूलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. देवदर्शनावरून परतताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.