मुंबई: जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याचे संघाबाहेर असणे म्हणजे टीम इंडियासाठी मोठा धक्काच आहे. सिडनीत खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत बुमराहला पाठीचे दुखणे सुरू झाले. यानंतर तो स्कॅनसाठी गेला होता. यानंतरपासूनच बुमराहच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त हो होती. आता समोर आलेल्या रिपोर्ट्मध्ये सांगितलेय की बुमराह फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात खेळू शकत नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहच्या उपलब्धतेबाबत अद्यापही सवाल सुरू आहे. मात्र आता निवड समितीला उत्तर मिळाले आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फिट असू शतो. याचा सरळ अर्थ आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील सामन्याला तो मुकू शकतो.
बुमराहच्या पाठीला सूज आहे. त्यामुळे तो नॅशनल क्रिकेट अकादमीला रिकव्हरीसाठी जाण्याची शक्यता आहे. एनसीएमध्ये वेळ घालवल्यानंतर भारतीय गोलंदाजाकडे फिटनेसचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तसेच एक अथवा दोन सराव सामने खेळावे लागतील.
सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह रिहॅबसाठी एनसीएला जाईल. सुरूवातीच्या रिपोर्टनुसार त्याला फ्रॅक्चर नाही आहे मात्र पाठीला सूज आहे. यासाठी एनसीए त्याच्या रिकव्हरीसाठी मॉनिटर करेल. तेथे तो दोन आठवडे राहील.
एकीकडे जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर आली असता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. शनिवारी बीसीसीआयकडून इंग्लंडच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली. यात शमीच्या नावाचाही समावेश आहे. शमी तब्बल १४ महिन्यांनी टीम इंडियामध्ये परतत आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…