IPL 2025: आयपीएल २०२५ हंगामाच्या तारखेची घोषणा, या तारखेपासून सुरू होणार सामने

  141

मुंबई: आयपीएल २०२५बाबत(IPL 2025) मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम आधी १४ मार्चला सुरू होणार होता. मात्र आता याची सुरूवात २१ मार्चपासून होणार आहे. यासोबतच फायनल सामन्याची तारीख आणि ठिकाणाबाबतही अपडेट मिळाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली.


मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल २०२५चा पहिला सामना २५ मार्चला खेळवला जाईल. तर फायनल सामना २५ मेला खेळवला जाईल. ही स्पर्धा आधी १४ मार्चला सुरू होणार होती. मात्र आता वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमला संधी मिळणार आहे. येथे पहिले दोन क्वार्टर सामने खेळवले जाईल.



कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवला जाणार फायनल सामना


कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४मध्ये चॅम्पियन्स बनले होते. दरम्यान, यावेळेस फायनल सामना ईडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात येईल. यासोबतच प्लेऑफ सामनेही खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत लवकरच मीटिंग करेल.



WPL 2025 बाबत समोर आले हे अपडेट


रिपोर्ट्सनुसार महिला प्रीमियर लीग २०२५ बाबत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. यावेळेस स्पर्धेसाठी चार ठिकाणे निवडली जातील. डब्लूपीएलचे सामने चार शहरांमध्ये खेळवले जातील. यात मुंबई, लखनऊ, बंगळुरू आणि वडोदराचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत स्पर्धेच्या तारखेबाबत अपडेट मिळालेली नाही.

Comments
Add Comment

Diamond League 2025 Final : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर, ज्यूलियन वेबरने जिंकले विजेतेपद

झुरिच: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग २०२५ च्या अंतिम

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर

बंगळुरु चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या तीन महिन्यानंतर आरसीबीची भावुक पोस्ट

नवी दिल्ली :  आयपीएल २०२५ चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर सोशल मीडियावर परतले आहे. त्यांनी बंगळुरूमधील

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'